chate public school 100% result

चाटे पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजचा दहावी बोर्ड परीक्षेत 100% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे : फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) बोर्ड परीक्षेमध्ये चाटे पब्लिक स्कूलअ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

आज दुपारी 1 वाजता चाटे पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष प्रा. फुलचंद चाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सचिव सौ. वैशालीताई चाटे, प्राचार्या नवनीत राजपाल, प्राचार्य रणजित जगताप, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रा. फुलचंद चाटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माधव किरण आळंदकर (92.60%), शिवांजली शहाजी जाधव (92.40%), रेवती शंकर रावलु (91.20%), अथर्व धनंजय कदम (90.20%), रूद्र आशिष यादव (90%), श्रेया केदारनाथ माचिकर (87.60%), आर्यन बालाजी धस (87.20%), रुतुजा कैलास सावंत (86.40%), श्रेया नंदकुमार धिवार (85.80%), दिपिका संदीप भरेकर (85.80%), रुतिका मच्छिंद्र कारलेकर (84%), श्रेयश मल्हारी शिंदे (83.20%), कादंबरी गणेश आदमाने (83%), दक्ष सचिन खंदारे (82.40%), ओम माधव तळेकर (82.40%), प्रदीप कच्छबरम सुतार (81.40%), रोनक मनोज बियाले (80.80%), मितेश कैलास बर्मा (80.40%) आणि ईश्वरी अनिल बडंबे (80.40%) यांचा समावेश होता.

यासोबतच वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. यावेळी पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, चाटे स्कूलचा अभ्यासाचा पॅटर्न यशस्वी ठरल्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल उत्कृष्ट लागला असून त्यांच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुंदर सुरुवात झाली आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. फुलचंद चाटे म्हणाले की, “आजचे यश हे एका-दोन दिवसांचे नसून नववीपासून शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि पालकांनी दिलेल्या प्रेरणेचे फलित आहे. विद्यार्थ्यांनी आजच्या निकालावर न थांबता पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी.”

ते पुढे म्हणाले की, दहावीनंतर अकरावी-बारावी तसेच JEE, NEET, CET, NDA यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न वेगळा असतो. त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखून योग्य ठिकाणी प्रवेश घेणे आवश्यक आहे. मित्र किंवा नातेवाईकांच्या सांगण्यावरून नव्हे तर स्वतःच्या आवडीनुसार करिअरची दिशा ठरवावी.

“स्वतःमधील गुण ओळखा, सकारात्मक विचार ठेवा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करा. परीक्षेच्या काही दिवस आधी अभ्यास करण्यापेक्षा दोन वर्ष सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते,” असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमास समन्वयक अनंत इंगळे, ऋषिकेश अहिरराव, राधिका लोखंडे, स्नेहल पवार, प्रकाश खारतोडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजित जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *